Tuesday, December 8, 2015

शब्द



शब्द हे शस्त्र, अतिशय धारदार अणुकुचीदार असे कधी नेमकेपणाने वर्मावर बोट ठेवणारे तर कधी बोथट होऊन हळुवार फुंकर घालणारे, कधी मनाला कधी न मिटणारे चरे पाडणारे तर कधी आनंदाचे कढत कढत अश्रु काढणारे, कधी आदळणारे तर कधी रिझवणारे…कधी गडगडणारे तर कधी कडाडणारे ,कधी न व्यक्त होताही खूप काही बोलून जाणारे तर कधी बरसूनहि रिते न होणारे , कधी नको तेंव्हा पूर आणणारे तर कधी ऐनवेळी गोठणारे तर कधी शब्दांनाही निशब्द करणारे आणि निशब्दाला स्पर्शाची भाषा शिकवणारे….शिल्पा


No comments:

Post a Comment